ईदचा बोकड तयार करणे

ईदचा बोकड तयार करणे

Ø  बोकड तंदुरुस्त असावा..
Ø   बोकड एक वर्षाचा ( दोन दाती )असावा. 
Ø  बोकड तयार करण्यासाठी त्याची पचनशक्ती व्यवस्थित करावी, जेणेकरून बोकड जे काही खाईल तो ते व्यवस्थित पचवेल. त्यामुळे त्याचे योग्य आणि लवकर वजन वाढेल.
Ø  काळे मीठ ठेवा योग्य पचनशक्ती साठी, लिव्हर टॉनिक पाजा दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी 3 दिवस ( गरजेनुसार )
Ø  कॅल्शियम पण द्या.
Ø  दुध पण पाजू शकता जर खर्च केल्यास चालत असेल तर ( जर चांगला पैसा देणारे मार्केट असेल तर )
Ø  जास्त सुका चारा द्या ज्यामध्ये प्रोटिन्स जास्त असेल तो..{हरी पती, अझोला}
Ø  खुराक द्या  ( गहू, ज्उ, मका, हरभरा  इ.) एक वर्षाच्या बोकडांनी कमीतकमीत 700 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत रोज खुराक खायला पाहिजे.
Ø  दररोज सर्व बोकड व्यवस्थित खातात की नाही किंवा काही शारीरिक समस्या आहे का याचे रोज निरीक्षण करा. ज्यांना काही समस्या असेल तर ते सुरूवातीलाच थांबवता येतील आणि त्रास वाढायच्या आतच आपण ती समस्या सोडवू शकतो.
Ø   8  - 10 दिवसांतून एकदा बोकडांना आंघोळ घालावी..  स्वच्छ आणि निरोगी राहतो बोकड त्याने अजून मस्त खातो.

बाकीच्या किरकोळ गोष्टीपण लक्षात ठेवा जसे की, जंताचे औषध, लसीकरण, शेड ची व गव्हाणीची स्वच्छता... इ.
Sirohi



Comments