शेळयांना द्या सकस आहार.
बंदिस्त शेळीपालन ही संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे, या व्यवसाया मध्ये ६० ते ७० टक्के खर्च हा शेळयांच्या खाद्यावर होत असल्यामुळे बंदिस्त पध्दतीने संगोपन करणार्या शेळी पालकांना, हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या किफायतशीर होण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. या करिता कमी खर्चा मध्ये शेळयांना सकस आहार देणे आवश्यक आहे.
शेळी हा रवंथ करणारा लघु प्राणी आहे, म्हणजेच एकदा खाल्लेले अन्न त्या पुन्हा तोंडात आणून चघळतात. रवंथ करणार्या प्राण्याच्या पोटाचे चार भाग असतात त्यामध्ये,
१. कोठी पोट (Rumen)
२. जाळीदार पोट (Reticulum)
३. पडदे पोट (Omasum)
४. जठर पोट (Abomasum)
जन्मलेल्या करडांच्या संयुक्त पोटामधील सर्व भागाची वाढ झालेली नसते. जन्मता: फक्त एकच पोट (जठर पोट) अस्तीत्वात असते, त्यामुळे तंतुमय खाद्य पदार्थ, चारा, वैरणीचा अन्न म्हणून पुरेपूर उपयोग होऊ शकत नाही. याकरिता करडे दीड ते दोन महीने वयाच्या काळात फक्त दुधावर जोपासवी लागतात. या काळात करडांच्या संयुक्त पोटातील पहिल्या तीन भागाची (कोठी पोट, चाळीदार पोट, पडदे पोट) वाढ पूर्ण होऊन करडे रवंथ करण्यास सुरवात करतात. शेळ्या मध्ये चर्यामधील असलेले सेल्युलोज या अन्नघटकाचे पचन करण्याची क्षमता असते आणि हा ऊर्जा मिळण्याचा मुख्य स्त्रोत असतो.
१. कोटी पोट (Rumen): कोटी पोटातील अंबवण्याच्या व जैविकक्रिये व्दारे तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने व थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थाचे विघटन व पचन होते. या पचन क्रिये बरोबरच पाचक अन्नद्रवे (अस्थिर स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, अमोनिया वायु), पाणी व क्षाराचे कोटीपोटातील अंतस्त्वचे मधून सूक्ष्म रक्त वहीने व्दारे, रक्तामध्ये शोषण केले जाते व द्रवरूप अन्न पुढे सरकत राहते. कोटी पोटामध्ये असलेले जिवाणू तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ व नत्रयुक्त प्रथिनाचे विघटन व पचन करून अस्थिर स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, अमोनिया वायु व “ब” जीवनसत्व तयार करतात व याचा शेळयांना शरीर पोषणा साठी उपयोग होतो.
२. जाळीदार पोट (Reticulum): जाडीदार पोटाचा आकार व क्षमता लहान असून त्याचे स्थान कोटी पोटाच्या समोरील तळ बाजूस असते. चार्यामधून कोटी पोटात आलेल्या जड वस्तु द्रवरूप चार्यापासून वेगळे करण्याचे काम जडीदार पोटाचे असते. त्यामुळे या पोटाला “हार्डवेयर स्टमक” असे म्हणतात.
३. पडदे पोट (Omasum): हे तिसरे पोट असून याचा आकार गोलाकार असतो, आतील आवरण पातळ पडद्याचे बनलेले असते. पडदे पोटाचे मुख्य कार्य म्हणजे अन्नद्रव्या मधील पाणी शोषून घेणे.
४. जठर पोट (Abomasum): जन्माच्या वेळी फक्त जठर पोट क्रियाशील असते, त्यामुळे याला खरे पोट असे म्हणतात. जठर पोटामध्ये तयार होणार्या पाचकरसा व्दारे अन्नमधील, दुधामधील जवळजवळ सर्वच अन्नद्रव्याचे (पिष्टमय, स्निग्ध व प्रथिने) विघटन व पचन होण्याचे कार्य या पोटामध्ये होते.

शेळयांना आवश्यक असणारे पोषक अन्नघटक: शेळयांना खाद्या मधून खालील अन्न घटकातील गरज असते.
• प्रथिने (Protein)
• पिष्टमय पदार्थ (Carbohydrate)
• स्निग्ध पदार्थ (Fat)
• जीवनसत्वे (Vitamin A,D,E)
• खनिज (Mineral)
• पाणी (Water)
• प्रथिने (Protein)
• पिष्टमय पदार्थ (Carbohydrate)
• स्निग्ध पदार्थ (Fat)
• जीवनसत्वे (Vitamin A,D,E)
• खनिज (Mineral)
• पाणी (Water)
शेळयांचा आहार:
शेळयांना त्यांच्या शारीरिक पोषणाच्या गरजेनुसार संतुलित आहार देणे आयश्यक असते, आहारा मध्ये हिरवी वैरण (Green Fodder), कोरडा चारा (Dry Fodder) व संतुलित आहार (Concentrate) याचा गरजे नुसार समावेश करने आवश्यक असते.

शेळयांच्या शारीरिक वजनानुसार आवश्यक आहार:
जन्मा नंतर करडे/पिल्लांना पहिले दिन दिवस साधारण पणे वजनाच्या १०
टक्के या प्रमाणात दिवसातून तीन ते चार वेळेस चिक पाजावा, त्यानंतर चौथ्या दिवसापासून खलील प्रमाणे आहाराचे नियोजन करण्यात यावे.

टीप: गाभण शेळ्या, विलेल्या शेळ्या तसेच पैदशीचे बोकड यांना अतिरिक्त १०० ग्रॅम संतुलित आहार तसेच १ ते २ किलो हिरवी वैरण द्यावे.
संतुलित आहार म्हणजे काय ?
शेळयांना पोषणा करिता पोषक अन्नघटकांची आवश्यकता असते, चार्या मधून शेळयांना सर्वच अन्न घटक पुरेश्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे शेळयांना संतुलित आहार ज्या मध्ये प्रथिने (Protein), पिष्टमय पदार्थ (Carbohydrate),स्निग्ध पदार्थ (Fat), जीवनसत्वे (Vitamin A,D,E), खनिज (Mineral) इत्यादि पोषक अन्न घटकांचा समावेश असतो.

संतुलित आहारा मधील खाद्य पदार्थाचे प्रमाण:
धान्य पदार्थ टक्के/ भाग
तूर/चणा/उडीद/चवळी २०
मका भरडा २२
गव्हाचा कोंडा २०
भुईमुंग पेंड/ सोयाबीन पेंड /सरकी पेंड/ सूर्यफूल पेंड ३५
खनिज मिश्रण २.५
मीठ ०.५

Comments
Post a Comment