मुरघास तयार करताना :-
1) मका पीक दुधात असताना कापावे. ज्वारी फुलोऱ्यात असताना कापावी. डाळवर्गीय चारा हा फुलोऱ्यात असताना कापावा. यापासून बनवलेल्या मिश्रणाचा मुरघास हा स्वादिष्ट, रुचकर व संतुलित असतो.
2) मुरघास तयार करण्यासाठी सर्वच चारापिकांचा वापर करता येतो. काही पिके ही हिरव्या चाऱ्यासाठी उपयुक्त नसली तरी त्याचा मुरघास केला जाऊ शकतो. कडवटपणा असलेल्या पिकांपासून मुरघास बनवताना प्रक्रियेदरम्यान कडवटपणा नाहीसा होतो.
3) मुरघासासाठी मका हे पीक चांगले आहे. मुरघास बनविताना त्याच्या कापणीच्या वेळी त्यामध्ये शुष्क पदार्थ व साखरेचे प्रमाण योग्य असते. ज्वारी पिकापासूनदेखील चांगल्या प्रकारचे मुरघास बनविता येतो. गोड ज्वारीपासून बनवलेला मुरघास हे ज्वारीच्या (धान्यासाठी वापरण्यात येणारे पीक) मुरघासापेक्षा उत्कृष्ट असते.
4) एकदल व द्विदल पिकाच्या चाऱ्यापासूनदेखील मुरघास केला जातो; परंतु काही कारणामुळे मुरघास करताना विशिष्ट घटकांमुळे काही पद्धतीचा वापर करावा लागतो.
5) पिकामध्ये अत्यल्प साखर असते, जी आम्लता बनविण्यासाठी आणि जिवाणूच्या विघटनासाठी उपयुक्त असते.
6) तृणधान्य पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. जिवाणूंची त्यावर प्रक्रिया होऊन अमोनिया तयार होतो, त्या बदल्यात आम्लतेचे प्रमाण कमी होते.
7) या चारापिकामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते.
8) जेव्हा आपण बरसीम या चारापिकापासून मुरघास बनवतो, तेव्हा त्या पिकाच्या दांड्यामध्ये पोकळी असल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात हवा राहते, जी काढून टाकण्यास जिकिरीचे काम असते.
विशिष्ट पद्धती ः
1) चारा सुकवून त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करणे.
1) चारा सुकवून त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करणे.
2) ज्वारी, मक्याचा संयुक्त मुरघास बनवावा.
मुरघासाचा खड्डे –
1) मुरघास बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे करता येतात. सिमेंट कॉंक्रीटच्या खड्डा तसेच प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करता येतो.
1) मुरघास बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे करता येतात. सिमेंट कॉंक्रीटच्या खड्डा तसेच प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करता येतो.
2) ज्या विभागात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जमिनीवर टाकी बांधावी. ज्या विभागात पावसाचे प्रमाण कमी असते त्या भागात अर्धा खड्डा जमिनीत करून वरच्या बाजूला टाकीसारखे बांधकाम करावे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे तेथे संपूर्ण खड्डा जमिनीत करावा. खड्ड्याला सिमेंट कॉंक्रीटने तळाला, चोहो बाजूंनी लिंपून घ्यावे, जेणेकरून बाहेरील पाण्याचा अंश खड्ड्यामध्ये येणार नाही. –
मुरघास तयार करण्याची पद्धत :–
1) चारापिके 50 टक्के फुलोऱ्यात असताना कडबाकुट्टी यंत्राने लहान तुकडे करावेत.
2) एकदलवर्गीय पिकापासून आणि द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास बनविताना 4ः1 प्रमाण घ्यावे. याचा रूचकर मुरघास बनतो.
1) चारापिके 50 टक्के फुलोऱ्यात असताना कडबाकुट्टी यंत्राने लहान तुकडे करावेत.
2) एकदलवर्गीय पिकापासून आणि द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास बनविताना 4ः1 प्रमाण घ्यावे. याचा रूचकर मुरघास बनतो.
3) एकदलवर्गीय पिकापासून मुरघास बनवितेवेळी एक किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण चाराकुट्टीवर शिंपडावे. द्विदलवर्गीय पिकापासून मुरघास बनविताना त्यावर गूळ द्रावणाचे मिश्रण शिंपडावे. यासाठी एक किलो गूळ 100 लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे.
4) अशा प्रकारची कुट्टी तयार करून खड्ड्यात एक फुटापर्यंत थर येईल अशा पद्धतीने भरावी. प्रत्येक थरानंतर वर सांगितलेले द्रावण शिंपडावे.
5) चाराकुट्टीचा थर खड्ड्यात भरताना दाब द्यावा, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देत जाऊन खड्डा भरावा. त्यावर वाळलेले गवत किंवा कडबा यांच्या मदतीने आच्छादन करावे.
6) शेण व मातीच्या मिश्रणाने नंतर लिंपून गोलघुमटासारखा आकार द्यावा.
7) साधारण दोन महिन्यांनी चांगला, स्वादिस्ट, रुचकर असा पौष्टिक मुरघास तयार होतो.

मुरघास तयार होताना –
1) मुरघास तयार करत असताना खड्ड्यात हिरवा चारा हवाबंद करणे फारच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच चारा आहे त्याच परिस्थितीत राहतो.
1) मुरघास तयार करत असताना खड्ड्यात हिरवा चारा हवाबंद करणे फारच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच चारा आहे त्याच परिस्थितीत राहतो.
2) खड्ड्यामध्ये आपण हिरवे गवत, चाऱ्याची कुट्टी हे सर्व दाब देऊन भरत असल्यामुळे खड्ड्यात हवा राहत नाही. जेवढी आतमध्ये हवा असेल, ती चाऱ्यातील पेशींच्या उपयोगी पडते म्हणजेच पेशींच्या श्वसन क्रियेसाठी वापरली जाते. त्यानंतर हवा जर नसेल तर श्वसनक्रिया थांबली जाते. पेशींच्या श्वसनक्रियेमुळे आतमधील तापमान वाढते, त्यामुळे जे काही सडण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणारे
जीवाणू असतील, ते तापमान वाढल्यामुळे नष्ट होतात. खड्ड्यामधे हवा नसल्यामुळे बुरशीची वाढदेखील होत नाही. याउलट आम्लता तयार करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
जीवाणू असतील, ते तापमान वाढल्यामुळे नष्ट होतात. खड्ड्यामधे हवा नसल्यामुळे बुरशीची वाढदेखील होत नाही. याउलट आम्लता तयार करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
3) चाऱ्यातील कर्बोदके व शर्करा यांचा उपयोग करून हे जीवाणू आम्ल तयार करतात. या आम्लात लॅक्टिक आम्ल भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त ब्युटिरिक आम्ल, ऍसिटिीक आम्ल व इथिल अल्कोहोलदेखील थोड्या प्रमाणातच तयार होतात; पण लॅक्टिक आम्लाचे प्रमाण जास्त असते. आम्लतेचा सामू चार झाला तर आम्ल तयार करणाऱ्या जिवाणूंची क्रिया थांबते. मुरघास बनवत असताना काही चारापिकांमध्ये
उसाची मळी किंवा पिष्टमय पदार्थ मिसळले जातात.
उसाची मळी किंवा पिष्टमय पदार्थ मिसळले जातात.
मुरघासाचे वर्गीकरण –
1) अत्यंत चांगला मुरघास – मुरघासास चांगला वास येतो. सामू 3.7 – 4.2 एवढा असतो. त्यामध्ये असणाऱ्या नायट्रोजनच्या प्रमाणापैकी 10 टक्के अमोनिया असतो. यामध्ये ब्युटिरिक आम्लाचा सामावेश नसतो.
1) अत्यंत चांगला मुरघास – मुरघासास चांगला वास येतो. सामू 3.7 – 4.2 एवढा असतो. त्यामध्ये असणाऱ्या नायट्रोजनच्या प्रमाणापैकी 10 टक्के अमोनिया असतो. यामध्ये ब्युटिरिक आम्लाचा सामावेश नसतो.
2) चांगला मुरघास – समाधानकारक वास असून, त्याचा सामू 4.2 – 4.5 एवढा असतो. एकूण नायट्रोजनपैकी 10 ते 15 टक्के हा अमोनिया असतो. यामध्ये थोड्या प्रमाणात ब्युटिरिक आम्ल असते.
3) बऱ्यापैकी असलेला मुरघास – ब्युटिरिक आम्ल आढळत असल्यामुळे त्यास खराब वास येतो. सामू हा 4.5 – 4.8 च्या दरम्यान असतो, तर एकूण नायट्रोजनपैकी 15-20 टक्के अमोनिया असतो.
4) खराब मुरघास – यामध्ये ब्युटिरिक आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वासदेखील खराबच येतो. त्याचा सामूदेखील 4.8 च्या वर असतो. एकूण नायट्रोजनच्या प्रमाणापैकी 20 टक्के हा अमोनिया असतो.
मुरघासाचे फायदे –
* मुरघास कोणत्याही हंगामात बनवता येऊ शकतो.
* हिरव्या चाऱ्यात जेवढे पोषक अन्नद्रव्ये असतात, तेवढेच पोषक अन्नद्रव्ये त्या चाऱ्यापासून तयार केलेल्या मुरघासमध्ये असतात.
* कमीत कमी जागेमध्ये मुरघास बनवता येतो.
* वाळलेल्या चाऱ्यातून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यापेक्षा मुरघासातून मिळणारे अन्नद्रव्ये हे उच्चप्रतीचे असतात.
* मुरघास हे स्वादिष्ट, रुचकर व रसदार असल्यामुळे जनावरे वाया न घालवता संपूर्णपणे खातात.
* मुरघास जर दुधाळ जनावरास खाऊ घातला तर त्या जनावरापासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पादनात वाढ होते.

Comments
Post a Comment