जनावरांसाठी पोषक फीड ब्लॉक्स
उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार करून जनावरांसाठी चारा व पशुखाद्याचे परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करता येतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध चाऱ्याचा परिपूर्ण उपयोग करून चाऱ्याची कमतरता कमी करता येते. त्यामुळे वर्षभर चारा पुरवठा होण्यास मदत होते.
फीड ब्लॉक -
जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवून दळून घेतले जातात. दळलेल्या मिश्रणाचे हायड्रॉलिक दाबाच्या साह्याने फीड ब्लॉक बनवले जातात.

फीड ब्लॉकचे जनावरांच्या आहारातील महत्त्व
- जनावरांना संतुलित आहार मिळण्यास मदत होते.
- एक-एक खाद्य घटक किंवा चारा वेगवेगळा दिल्यास जनावर केवळ आवडीचा चारा किंवा खाद्य खातात व इतर चारा किंवा खाद्य न खाता वाया जाते. हे टाळण्यासाठी जनावरांना फीड ब्लॉक्स देणे महत्त्वाचे आहे.
- चारा वाया न गेल्यामुळे कमी चाऱ्यात जास्त जनावरांचे संगोपन होते व चारा बचतही होते.
- चारा जनावरांना टाकण्यावरील खर्च, वेळ तसेच जनावरांचा चारा खाण्यावरील वेळ वाचतो.
- चाऱ्याची घनता वाढल्यामुळे कमी जागेत जास्त चारा साठवता येतो.
- चाऱ्याचा अपव्यय टळून उकिरड्यावरील चाऱ्याचे प्रमाण कमी होऊन वातावरणाचे प्रदूषण टाळता येतो.
- जनावरांची उत्पादन व प्रजननक्षमता वाढते.
- रवंथ करणाऱ्या जनावरांच्या शरीरातून मिथेन वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतो.
- जनावरांचे आजार टळून अारोग्य उत्तम राहते.
- पूरक खाद्य तसेच क्षार मिश्रण, औषधे फीड ब्लाॅक्समधून देता येतात.
- संपूर्ण चारा ब्लॉक्स किंवा परिपूर्ण फीड ब्लॉक्सचा उपयोग ज्या भागात चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा थोडाही चारा उपलब्ध नाही या भागात होतो.
- कमी खर्चात व वेळेत जास्त चाऱ्याची वाहतूक करता येते.
- स्थानिक पातळीवर उपलब्ध चाऱ्याचा परिपूर्ण उपयोग करता येतो त्यामुळे चारा कमतरता जाणवत नाही व सतत वर्षभर चारा पुरवठा होण्यास मदत होते.
- पोषणतत्त्वांचा अभाव कमी होण्यास मदत होते.

कम्प्लिट फीड ब्लॉक बनवण्यासाठी लागणारी यंत्रे -
१. ग्राइंडर - पशुखाद्य घटक दळून किंवा भरडून घेण्यासाठी ग्राइंडरचा उपयोग होतो.
२. टी.एम.आर. मिक्सर - यामध्ये हलक्या प्रतीचे खाद्य घटक जसे कडबा, बगॅस, वाळलेले गवत, वाळलेला झाडपाला तसेच पशुखाद्य घटक, पूरक खाद्य मिश्रण आणि मळी यांचे योग्य मिश्रण होऊन फीड ब्लॉक तयार होतो.
३. डेन्सीफायर - यामध्ये हायड्रोलिकच्या दाबाने संपूर्ण घटकांचा फीड ब्लॉक तयार होतो.

परिपूर्ण फीड ब्लॉकसाठी अावश्यक बाबी
- बाजारात ०.५ ते ३ टन प्रतितास क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत त्यांना २०-४० एचपी क्षमतेच्या मोटारीची गरज असते. प्रति टन १२ ते १६ किलोवॉट लाईटची गरज असते.
- या यंत्राचा वापर करून ७ ते ३० किलो वजनापर्यंतचे ब्लॉक्स बनवता येतात.
- एका फीड ब्लॉकमध्ये एका जनावराची २४ तासांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते.
- परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करताना जनावरांचे उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार करून चारा घटक व पशुखाद्य घटक निवडावेत.
- जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी संरक्षित प्रथिने आणि संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही वापर करता येतो.
- परिपूर्ण फीड ब्लॉकमध्ये चारा, पशुखाद्य घटक याबरोबरच खनिज मिश्रण, प्रोबायोटिक्स, विकर, बेन्टोनाईट इ. वापर करता येतो.
- सर्वसाधारणपणे जनावरांच्या शरीरपोषणासाठी ८६ टक्के कडबा, १० टक्के मळी, २ टक्के धारमिश्रण + १ टक्का मीठ असे प्रमाण ब्लॉकमध्ये ठेवावे.
- दूध उत्पादनवाढीसाठी ब्लॉक तयार करताना यातील कडब्याचे प्रमाण कमी करून आणि पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे.

परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करण्याची पद्धत -
- जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवून घ्यावे.
- ग्राईंडरने पशुखाद्य घटक भरडून घ्यावेत.
- पशुखाद्य मिश्रणामध्ये इतर पूरक घटक मिसळावेत.
- कुट्टी केलेल्या चाऱ्याचा उपयोग करावा.
- चारा व पशुखाद्य हे योग्य प्रमाणात मिसळून त्यामध्ये मळी, बेन्टोनाईट इ. चा वापर घट्टपणासाठी करावा.
- सर्व मिश्रित घटक डेन्सिफायरमध्ये दळून हायड्रॉलिक दाबाच्या साह्याने ब्लॉक बनवावा.

Comments
Post a Comment